मंचर- आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य संजीव थोरात यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जनता दरबारामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेशावेळी संजीव थोरात यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखेले, माजी तालुकाप्रमुख सुनिल बाणखेले, युवानेते योगेश थोरात, उपतालुकाप्रमुख अशोक थोरात, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी कल्पेश बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, मंचरचे माजी उपसरपंच महेश थोरात, नितीन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच सुमन थोरात यांनी शिवसेना पक्षप्रवेशाबद्दल स्वागत केले.