पिंपरीचिंचवड – भोसरीतील भोजापूर जैन संघाकडून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पूरग्रस्त ब्रम्हणाळ गावाच्या लगत असलेल्या सुखवाडी गावाला दत्तक घेत त्या गावातील सर्वच कुटुंबांना घरात लागणारे साहित्य, खाद्य पदार्थ, भांडी, ब्लेंकेट, लहान मुलांना कपडे, महिलांना साड्या व पशू साठी लागणारे औषधे असे सर्व साहित्य सोमवारी (दि.19) पुरवण्यात येणार आहे. यासाठी भोसरी येथे प्रत्येक कुंटुबासाठी एक संच अश्या पद्धतीने तयार करण्यात येत आहे. याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद…