पालिकेच्या शाळेलाही स्वच्छता रॅकिंग मध्ये पहिला क्रमांक
पुणे: स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत महापालिकेकडून शहरातील शासकाकीय कार्यालये, हॉस्पीटल तसेच मार्केटसह हॉटेल व्यावसायिकांसाठी स्वच्छता रिँक़ग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शासकीय कार्यालय श्रेणीत आयकर विभाग सर्धाविक स्वच्छ कार्यालय ठरले आहे. तर महापालिकेची हंबीराव कृष्णा मोझे प्राथमिक विद्यालय शाळा. क्र 90 ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या वर्षातील तिसऱ्यांदा हे रॅकिंग काढण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शहरातील शाळा, हॉटेल्स, हॉस्पीटल्स, , शासकीय इमारती व मार्केट असोसिएशन यांचे स्वच्छतेच्या दृष्टीने रैंकिंग करणे हा महत्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण 2020 , तृतीय लीगमधील रॅकिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 280 शाळा, 267 हॉटेल्स, 217 हॉस्पिटल्स, 412 खासगी सोसायटया , 24 मार्केट असोसिएशन व 58 शासकीय कार्यालये यांचे रॅकिंगबाबतचे फॉर्म महापालिकेकडून भरून घेण्यात आले होते. त्यानुसार, आस्थापनेच्या प्रवेश- निर्गमनद्वाराची स्थिती, परिसरातील फुटपाथ व रस्त्यांची स्थिती, तेथील कचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग करतात कि नाही, तेथील शौचालयांची स्थिती यासारख्या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले असून त्यानुसार सर्व आस्थापनांना रॅकिंग देण्यात हॉटेल्स श्रेणीमध्ये हॉटेल ग्रीन पार्क, हॉस्पिटल्स श्रेणीमध्ये सिटी नर्सिंग होम, येरवडा, कोथरुड, मार्केट असोसिएशन श्रेणीमध्ये अखिल भुसारी कॉलनी, व खासगी सोसायटया श्रेणीमध्ये टेन कस्तूर कुंज को.ऑप.हौ.सोसायटी, शिवाजीनगर-घोलेरोड यांना प्रथम क्रमांकाचे रॅकिंग देण्यात आले आहे.