वॉशिंग्टन – भारतातील सीरम इन्स्टिट्युटने अमेरिकेकडे लसीसाठीच्या कच्चा मालावरील निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे मात्र त्याबाबत अमेरिकेने मौन बाळगले आहे. आज व्हाईट हाऊस प्रवक्त्यांना पत्रकारांनी या विषयी प्रश्न विचारला असता त्यावर कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.
त्यांनी सांगितले की या प्रश्नावर सध्या माझ्याकडे उत्तर नाही, मी माहिती घेऊन नंतर तुम्हाला या बाबतीत सांगेन. लस आणि लसीला लागणारा कच्चा माल या विषयावर आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहोत. लस वितरणाबाबत कोठेही भेदभाव दिसू नये किंवा अविकसित देशांना लसीचा पुरवठा करण्याबाबत दुजाभाव केला जाऊ नये अशीच अमेरिकेची भूमिका राहिली आहे असे या प्रवक्त्यांनी नमूद केले.