नवऱ्यासाठी करियर अन् मुलींच्या करियरसाठी संसार सोडला; वाचा 70 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री बबिताची आगळीवेगळी कहाणी!

आज 20 एप्रिल. हिंदी सिनेसृष्टीतील 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कपूरचा आज वाढदिवस. त्यांची चित्रपट कारकिर्द कदाचित थोड्या कमी कालावधीची होती. परंतु प्रसिद्धी आणि कीर्ति मिळवल्यानंतरही कपूर घराण्याची सून होण्यासाठी पैसा, प्रसिद्धी सर्व नाकारून आनंदाने गृहिणी बनण्यास बबिता तयार झाल्या. अभिनेते रणधीर कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर दोन मुली करिष्मा आणि करीना यांच्या संगोपनात वेळ घालवीला.

परंतु इतक्या बलिदानानंतरही जेव्हा त्यांना नवऱ्याचे प्रेम प्रेम मिळाले नाही, तेव्हा दोन मुलींना घेऊन सासर सोडण्याचे धाडस बबितानी दाखविले. कपूर घराण्याची परंपरा मोडून या दोन मुलींना अभिनेत्री बनवले. होय, नवऱ्यासाठी करियर सोडलेल्या आणि मुलींच्या करियरसाठी नवऱ्याचा संसार सोडलेल्या बबिता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील रंजक वळण जाणून घेऊया.

20 एप्रिल 1948 रोजी सिंधी कुटुंबात जन्मलेल्या बबिताचे कुटुंब मूळचे पाकिस्तानचे होते. पण भारत-पाकिस्तान विभाजनाच्या वेळी तिचे कुटुंब भारतात आले होते. बबिता प्रसिद्ध अभिनेत्री साधनाच्या चुलत भगिनी. बबिताने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये फक्त 19 चित्रपट केले आहेत. डेब्यू चित्रपटासाठी त्यांना दहा लाख रुपये मिळाले होते. ‘राज’ या चित्रपटापासून बबिता यांना ओळख मिळाली. बबिता रणधीर कपूरच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर होते.

परंतु कपूर कुटुंबाची परंपरा होती की त्यांच्या घराची सून अभिनेत्री नसेल, म्हणून कपूर कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते. राज कपूरने बबीताला आपल्या चित्रपटात अभिनेत्री बनविण्यास मान्य केले, परंतु घराची सून म्हणून नव्हे. अशी वेळही आली जेव्हा रणधीरने बबिताला लग्न आणि करियर यामधून कोणतातरी एक पर्याय निवडण्यास सांगितले. तेव्हा बबिताने आपले करिअर सोडून रणधीरची निवड केली.

लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. रणधीर मद्यप्राशन करायला लागले आणि त्यांची फिल्मी कारकीर्द फ्लॉप होऊ लागली. या सर्व गोष्टींमुळे नाराज होऊन बबिता आपल्या पतीपासून मुलींसह विभक्त राहू लागली. त्यानंतर त्यांनी मोठी मुलगी करिश्मा यांना चित्रपटात आणण्याची तयारी केली. पण बबिताच्या या निर्णयानंतर तिचे आणि रणधीरचे नाती आणखी बिघडू लागले. आज बबीताच्या दोन्ही मुली बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री आहेत. करीना आणि करिश्मा या दोघांनी बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आणि हळूहळू बबिता-रणधीरचे अंतरही कमी झाले आणि दोघेही एकत्र राहू लागले.

बबिताने त्यांच्या आयुष्यात केलेली मोठी चूक, आपल्या मुलींना करू दिली नाही. करिश्माच्या कामाबद्दल आक्षेप घेतल्यामुळे करिश्मानेही पतीबरोबरचे संबंध तोडले, पण करिनाने लग्नानंतरही तिचे फिल्मी करियर सुरूच ठेवावे अशी सैफसोबत लग्नाची अट आधीच ठेवली होती. सैफ आजवर करीनाची ही अट मानली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.