सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक आणि सीक्वलचा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. येत्या काळात अनेक रिमेक आणि सीक्वल प्रदर्शित होत आहेत. त्यातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी “नो एण्ट्री 2′ ची घोषणा केली आहे. “नो एण्ट्री’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. “नो एण्ट्री’ हा 2002 साली प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट चार्ली चॅपलिनचा रिमेक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 14 वर्षे उलटली आहेत. चौदा वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येईन अशी घोषणा बोनी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहण्यासारख ठरणार आहे.
“नो एण्ट्री’मध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदिन खान, बिपाशा बासू, लारा दत्ता, ईशा देओल, सेलिना जेटली हे कलाकार होते. हा मल्ट्री स्टारर चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटात कोण असणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच या चित्रपटाच्या कथे बद्दलही सर्वांना उत्सूकता असून हा चित्रपटही नो एन्ट्री प्रमाणेच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.