भेटीगाठींना वेग; लवकरच राजकीय भुकंप घडवण्याची तयारी
कातरखटाव, दि. 11 (प्रतिनिधी)
माण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार युवा नेते शेखर गोरे यांनी प्रचाराच्यानिमीत्ताने मोठा झंझावात निर्माण केला आहे. मतदारसंघातील गावागावात त्यांच्याकडून गाठीभेटींना वेग आला असून तरूणाईसोबतच अबालवृध्दांचा शेखर गोरेंना वाढता पाठींबा पाहता भविष्यात माण मतदारसंघात राजकीय भुकंप होणारच असा आशावाद गोरंच्या कार्यकर्त्यांनकडून व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शेखर गोरे हे एकमेव असा उमेदवार आहेत जे स्वखर्चान गावागावात विकास कामे करतात, त्यामुळेच त्यांना आमदार करण्याचा विडा मतदारसंघातील जनतेने उचलल्याचे त्यांच्या पत्नी सोनलताई गोरे यांनी पाचवड (ता. खटाव) येथे व्यक्त केला.
शेखर गोरेंचा सुरू असलेला झंझावात अन् सोबतील सुरेखाताई पखाले, सोनलताई गोरे यांनी गावागावात विणलेले महिलांचे जाळे ही गोरे यांच्या जमेची बाजू असल्याचे जाणकार व्यक्तींकडून बोलले जात आहे.
त्यातच याच मतदार संघातील काही युवा नेत्यांचे शेखर गोरेंना पाठींबा देण्याचे ठरल्याने भविष्यात माण मतदारसंघात राजकीय भुकंप घडल्यास नवल वाटायला नको.
Nice …Only shivsena..????