युवा सेनेचे खंडूराजे कवादे यांचा भाजपात प्रवेश

जामखेड (प्रतिनिधी) – येथील युवा नेते खंडूराजे कवादे यांनी युवा सेनेला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोंडी येथे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना कवादे म्हणाले, कि कर्जत जामखेड तालुक्यात पालकमंत्री राम शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला असून, आगामी काळात भाजपचे कार्य तळागाळात पोहचविण्याचे काम करणार आहे.

यावेळी पंचायत समिती सद्स्य डॉ भगवान मुरूमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, बापूराव ढवळे उपस्थित होते. अतुल मोहळकर, पप्पू खरात, अशोक कोळपकर, यांसह २५० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.