नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनौपचारिक चर्चेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग शुक्रवारी सकाळी तमिळनाडूतील चेन्नई येथे दाखल झाले. व्यापार, सीमा प्रश्नावरील वाद आणि परस्पर सहकार्य या विषयांवत मल्लपुरम येथे दोन्ही नेत्यात आज आणि आनंद अनौपचारिक शिखर परिषद होईल.
शी जिनपींग यांचे स्वागत करण्यासाठी चीनी नागरिक जमा झाले होते. तसेच चीनच्या या सर्वोच्च नेत्याची एक तरी छबी पहायला मिळावी म्हणून अनेक चेन्नईकर आयटीसी ग्रॅंड चोलाबाहेर थांबले होते. देशभरात विविध कामांसाठी राहणारे चीनी नागरिकांनी जमा झाले होते.
जोहू या चिनी नागरिकाने सांगितले की, मी मुंबईत काम करतो. आमच्या नेत्याची नजरभेट व्हावी म्हणून मी चेन्नईला आलो. त्यांनी माझ्याकडे पाहएून हात हालवला यात मला आनंद आहे. यावेळी एका चीनी महिलेला उन्हाचा त्रास झाला. तिच्यावर तातडीने प्राथमोपचार करण्यात आले.