जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी (दि. 19) तब्बल 37 करोनाबाधित आढळून आल्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 660 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 37 रुग्णांपैकी 28 रुग्णांचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा तर उर्वरित 9 रुग्णांचे अहवाल बुधवारी मिळाले आहेत. तालुक्यातील एकूण 660 बाधितांपैकी 482 व्यक्ती उपचारानंतर घरी परतले आहेत तर उर्वरित 148 क्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान नारायणगाव येथील एक करोनाबाधित महिला आणि काळवाडी येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील एकूण मृतांचा आकडा 30 झाला आहे. नव्याने वाढ झालेल्या रुग्णांपैकी जुन्नर शहरात सहा आणि सावरगाव व ओतूर येथे प्रत्येकी 5 व्यक्ती आढळून आल्या आहेत. नारायणगाव व रोहकडी येथे प्रत्येकी तीन तर निमगाव तर्फे म्हाळुंगे, गुंजाळवाडी, मांजरवाडी, पिंपरी पेंढार व खानगांव प्रत्येकी दोन व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. वडज, शिंदे, काळवाडी, आळे व आळेफाटा येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या आहेत.