नवी दिल्ली – ई-कॉमर्स वरून किरकोळ विक्री क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी जिओ मार्ट आणि व्हॉट्स ऍपदरम्यान सहकार्य करार झाला असून आता ग्राहक व्हॉट्स ऍपवरून जिओ मार्टकडे वस्तूंची यादी पाठवू शकतात असे आकाश आणि ईशा अंबानी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.
व्हाट्स ऍपवरून मिळालेली ऑर्डर पार्सलसाठी शुल्क न आकारता पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर कमीत कमी किती ऑर्डर असावी याची मर्यादा नाही. ई-कॉमर्स ऍपवरुन अनेक अर्धशिक्षित लोकांना आणि वृद्ध लोकांना ऑर्डर देता येत नसल्यामुळे ही पद्धत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून जिओ प्रीपेड रिचार्ज करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे अर्धशिक्षित आणि वृद्ध नागरिकांना रिचार्ज करताना त्रास होणार नाही असे त्यांनी सांगितले.