उत्तराखंड – चामोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात आता ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक घरांच नुकसान झाल आहे.
चामोली जिल्ह्यात शनिवारी रात्री ३ घरांचे नुकसान झाले असून २ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या भागातील लोकांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चामोरी जिल्ह्याचे दंडाधिकारी सध्या तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सध्यातरी येथील परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.