कर्जत, (प्रतिनिधी): कर्जत नगरपंचायत हद्दीतील समर्थ गार्डनच्या कंपाऊंडचे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींनी नुकसान केले. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नगरपंचायतचे कर्मचारी रवींद्रकुमार नेवसे यांनी याप्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे सभापती भाऊसाहेब तोडमल यांच्यासोबत समर्थ गार्डन येथे गेलो. गार्डनच्या गेटचे कुलूप लावलेले असताना महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कंपाउंडचे लोखंडी ग्रील तोडून नुकसान केले. त्यांच्याविरुद्ध कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी समर्थ गार्डन येथे दिवसा तीन वेळा व रात्री नऊ ते दहा या वेळेत गस्त घालावी, या मागणीचे निवेदन कर्जत पोलिसांना दिल्याची माहिती सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी दिली.