ह्युस्टनमध्ये मुसळधार पावसाचा कहर

हाऊडी मोदी कार्यक्रमापूर्वी वादळाने धुळधान

ह्युस्टन – येथे होत असलेल्या हाऊडी मोदी हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम काही एकदिवसांवर येऊन ठेपला असताना याठिकाणी आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादलाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मेगा इव्हेंटवर पावसाची अवकृपा झाली आहे.

या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 50000 अमेरिकी भारतीयांना संबोधीत करणार आहेत. त्या दृष्टीने कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच गुरूवारी या ठिकाणी जोरदार पावसाने आणि वादळाने हजेरी लावत जनजिवन विस्कळीत केले आहे.

त्यामुळे टेक्‍सासचे राज्यपाल ग्रेग ऍबॉट यांनी आग्नेय टेक्‍सासमधील 13 गावांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तथापि, हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.