वडगावशेरीत उद्यानांच्या विकासावर भर – मुळीक

मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांनी छत्रपती महाराज शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी गांधीनगर, म.हो. बोर्ड या भागात प्रचार फेरी काढली.

पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात विकसित करण्यात आलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे मतदारसंघाचे वैभव बनले आहे. याच धर्तीवर मतदारसंघात अनेक उद्याने विकसित करण्यात येत असून भविष्यात या मतदारसंघात सर्वाधिक उद्याने साकारण्यासह प्रत्येक परिसरात अत्याधुनिक सोयी असलेली उद्याने साकारण्याचे आश्‍वास महायुतीचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी मतदारांना दिले.
मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांनी छत्रपती महाराज शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी गांधीनगर, म.हो. बोर्ड या भागात प्रचार फेरी काढली.
या प्रचारफेरीत नगरसेवक बापुसाहेब कर्ण गुरूजी, राहुल भंडारी, ऍड. अविनाश साळवे, नगरसेविका श्वेता गलांडे, मुक्ता जगताप, शितल सावंत, माजी नगरसेवनक भगवान जाधव, भीमराव खरात, नौशाद शेख, नामदेव घाडगे, राजू बाफना, संतोष सुकाळे, विशाल साळी आणि आशा जगताप यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुळीक म्हणाले, “वडगाव शेरी मतदार संघातील लोकसंख्येनुसार, उद्यानांच्या आरक्षणांच्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व भागात उद्याने विकसित करण्यात येत आहेत. वडगावशेरी गावाची लोकसंख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे. या गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये 7 एकर जागेमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये पुणे शहराच्या इतर भागातून नागरिक येतात. या उद्यानाप्रमाणे कल्याणीनगर, गणेशनगर, विमाननगर, सोपाननगर, बॉम्बे सॅपर्स, चंदननगर, मैत्री उद्यान, जैवविविधता उद्यान, मारूतीनगर, नगररोड, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, येरवडा या उद्यानात विविध काम करण्यात येत असून त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.

नागरी सहभागातून वृक्षलागवड यशस्वी
गेल्या पाच वर्षांत राज्यशासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत मतदारसंघात हजारो नवीन झाडे लावण्यात आल्याचेही मुळीक यांनी यावेळी मतदारांशी बोलताना सांगितले. मतदार संघात ज्या भागात ही झाडे लावणे शक्‍य आहेत. अशा भागांची यादी तयार करण्यात आली असून महापालिका आणि वन विभागाच्या सहकार्यातून या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता. त्याला नागरिकांनीही मोठया प्रमाणात साथ दिल्याने ही झाडे लावणे शक्‍य झाल्याचे यावेळी ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here