मॉडर्नतर्फे सहा हजार वारकऱ्यांना नाष्टा वाटप

निमसाखर – निमसाखर (ता. इंदापूर) येथे संत संतराज महाराज व संत सोपानकाका महाराज पालखीसह अन्य पालख्या पंढरपुरसाठी परिसरातून प्रस्थान ठेवत असतात. या मार्गावरून लाखो भाविक जाताना वैष्णवांची सेवा घडावी, या हेतुने पाच वर्षांपासून मॉडर्न इंजीनियरिंगकडून वारकऱ्यांसाठी चहा, पाणी व नाष्ट्याची सोय करीत आहे. बारामती नरसिंहपूर मार्गावर संत सोपानकाका, संतराज महाराज, संत योगीराज महाराजांसह चार ते पाच पालख्या शनिवार दि. 6 जुलै रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मार्गावरून जातात. या मार्गावरून अनेक पालख्या जाताना वारकऱ्यांना पुरेशे अन्नदान मिळावे, या हेतूने मॉडर्न इंजीनियरिंग गेले पाच वर्षांपासून झटत आहे. परिसरात पालखी आगमनच्या दोन दिवस अगोदर तयारी सुरू असते. वारकऱ्यांसाठी मॉडर्न इंजीनियरिंगकडून तब्बल 5 ते 6 हजार वारकऱ्यांना नाष्टा व चहाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांसाठी दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी 5 हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरची सोय केली. या उपक्रमात मॉडर्न इंजीनिअरींगचे 70 कर्मचारी राबत आहेत. उद्योजक संतोष रणसिंग व उद्योजक विनोद रणसिंग यांनी वडिल भगवान रणसिंग यांचा आदर्श जोपासत पाच वर्षांपासून अन्नदान सुरू केले आहे. यावेळी यशवंत सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे, सुरेश लवटे, हर्षल रणवरे, धोंडिराम दळवी, सिद्धनाथ रणसिंग, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.