#HBD : अभिनेता ‘रणवीर सिंग’चा आज वाढदिवस..!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. ‘रामलीला’, ‘पद्मावत’ ‘गली बॉय’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सिम्बा’ अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून रणवीरने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. रणवीरचा जन्म 6 जुलै 1985 रोजी मुंबई मध्ये झाला असून, त्याचे मूळ नाव “रणवीर सिंग भवनानी” असं आहे.

रणवीर सिंगला पहिला ब्रेक 2010 मध्ये ‘बँड बाजा बारात’ चित्रपटात मिळाला होता. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू पुरस्कार देखील मिळाला होता. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत रणवीर बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यानंतर रणवीरने 2018 मध्ये अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’सोबत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.

View this post on Instagram

(In a nutshell)

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दरम्यान, आपल्या वाढदिवसा निमित्त रणवीरने त्याचा आगामी चित्रपट ’83’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. रणवीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याला कपील देव यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. आता रणवीरनेच त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)