महिलांसाठी करोना आजार जनजागृती शिबीर

महिला दिना निमित्ताने उपक्रम

पुणे : महिला दिनाच्या निमित्ताने वस्त्यांमधील महिलांना करोना या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी आयडेंटीटी फाऊंडेश या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील चुनखडी परिसरात मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी स्वत:च्या स्वच्छतेसह, परिसराची आणि चांगल्या आरोग्यासाठी करण्याच्या उपाय योजनांची माहीती देण्यात आली. यात सुमारे 35 महिला तसेच मुले सहभागी झाली होती. या आजाबाबत या वस्तीमधील नागरिकांमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत त्यांचे गैरसमज दूर करण्यात आले. यावेळी इको-लॉजिक फाऊंडेशनच्या नेहा पंडीत यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.
संस्थेच्या शिक्षिका निता भांडवलकर, योगिता पगारे, सविता गोंधळे, नुतन शिंदे, विष्णू सोनावणे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या वेळी करोना आजार, त्याचा होणारा प्रसार, आजार रोखण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, मुलांची काळजी कशी घ्यावी, दक्षतेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, परिसर तसेच स्वत:ची स्वच्छता कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती वस्तीमधील महिलांना तसेच मुलांना देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या विश्‍वस्त संगीता शिंदे- राऊत यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.