नवी दिल्ली : आर्थिक निर्णय घेताना भारतीय महिलांचा सहभाग वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार 68 टक्के महिला स्वत: चे आर्थिक निर्णय घेत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.
ऑनलाईन फायनान्स सेवा पुरवणाऱ्या स्क्रिपबॉक्सने संस्थेच्या सर्वेक्षणानुसार केवळ दहा टक्के महिलांनी कुटुंबातील पुरुष सदस्यावर आर्थिक निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविली आहे.
तसेच या सर्वेक्षणानुसार केवळ 30 टक्के महिला म्युच्युअल फंडासारख्या आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करता आहेत.
देशभरात 600 हून अधिक महिलांचे सर्वेक्षण फेब्रुवारी 2020 मध्ये स्क्रिपबॉक्सने केले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी 70 टक्के महिला 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या तर, 24 टक्के 30 पेक्षा जास्त वयाच्या असून, उर्वरित महिलांचे वय 50 पेक्षा जास्त होते .
या सर्वेक्षणानुसार,” सर्वेक्षणानुसार 47 टक्के महिला स्वत: ला आर्थिक साक्षर करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करतात.
सुमारे 80 टक्के महिला मासिक बचतीवर विश्वास ठेवतात. तर 20 टक्क्यांहून अधिक स्त्रिया मासिक उत्पन्नाच्या निम्म्या पैशाची बचत करतात.