भरणेवाडीत समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कुरवली- अखिल भारतीय माळी महासंघ व समता परिषदेच्या नवनिर्वार्चित पदाधिकाऱ्यांचा भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्‍यातील माळी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची नुकतीच अखिल भारतीय माळी महासंघ व समता परिषदेवरती नियुक्‍ती करण्यात आली. भरणेवाडी येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भरणे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भरणे म्हणाले की, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा. तसेच सर्व समाजातील तळागाळीत नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संघटनेच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावरती भर देण्याचे आवाहन केले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे, नारायण खराडे, किशोर वाघ, अतुल झगडे, नाना जाधव, दादाराम झगडे उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब लव्हे, तालुका उपाध्यक्ष विजय मारूती झगडे, चिटणीस लक्ष्मण वाघ, आघाडी प्रमुख डॉ. मधुकर राऊत, बिजवडी-वधू वर आघाडीप्रमुख राहुल भोंगळे, युवा अध्यक्ष इंदापूर तालुका प्रशांत म्हस्के, समता परिषदेचे पदाधिकारी, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्षपद दादासाहेब शेंडे, जिल्हा सहसंघटक नितीन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.