बोरीपारधीत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाइन मटक्‍यावर छाप्पा : नऊ जणांना अटक; दोघे फरार

यवत – दौंड तालुक्‍यातील बोरीपारधी गावच्या हद्दीत सुरू अलेल्या ऑनलाईन मटक्‍यावर टाकलेल्या छाप्यात दौंड पोलिसांनी 5 लाख 67 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर नऊ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरारी झाले आहेत. ही कारवाई रविवार (दि.28) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे.
रवींद्र दुर्गा शिंदे, आनंद बाळासाहेब दिवेकर, भाऊसाहेब वासुदेव फडके, दत्तात्रय अशोक माळवतकर, बाळकृष्ण आत्माराम अवचट, नायकोबा चिमाजी टूले, धनराज शिवाजी जगताप, नवनाथ आनंदा दळवी, सुधीर आनंदराव जाधव (सर्व रा. दौंड तालुका) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तेजस कांबळे, राजू दुर्गा शिंदे असे फरार असणाऱ्यांची नावे आहेत. तर पोलीस शिपाई कमलेश होले यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सचिन बारी यांना बातमी दारामार्फत चौफुला येथे गुरुदत्त फ्लाय अँड हार्डवेअरच्या शेजारी नाव नसलेल्या खोलीत ऑनलाईन मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार असिफ शेख, पोलीस नाईक दीपक वायकर, विजय पवार, पोलीस शिपाई गणेश कडाळे, किशोर वाघ, कमलेश होले, अभिजित चांदगुडे, सुरज गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल दीपक यादव, सोमनाथ सुपेकर, होमगार्ड इरफान शेख यांच्या पथकाने ही याठिकाणी छापा टाकीत कारवाई केली. या कारवाईत मटका चालविण्यासाठी लागणारे दहा संगणक, एक लॅपटॉप व आदी साहित्ये, रोख 78 हजार रुपये असा एकूण 5 लाख 67 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सर्व अकरा आरोपी विरोधात मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)