पोपटपंची करणारे राजकारणातून संन्यास घेतील का?

आता होऊ द्या, आमने -सामने : विरोधकांना डॉ. कोल्हे यांचे आव्हान

हडपसर- गेली अनेक वर्षे प्रतिनिधीत्व करूनही नागरिकांवर आपण यांना पाहिलंत का? अशा आशयाचे फलक लावण्याची दुर्दैवी वेळ कात्रज येथील मतदारांवर ओढवत असेल तर अशा खासदारांकडून विकासाची काय अपेक्षा करायची? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. शिवाय विकासाबाबत अकार्यक्षमता झाकण्यासाठी विरोधक माझ्याबाबत जे हीन पातळीवरचे राजकारण करीत आहेत, ते त्यांनी सोडावे. मी पुरावे देतो मग पोपटपंची करणारे राजकारणातून संन्यास घेतील का? असा सवाल करीत आता होऊ द्या, आमने -सामने म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला हडपसर परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान गेल्या पंधरा वर्षांपासून कोणत्या समस्या भेडसावत आहेत, खासदारांनी काय केले, याचा लेखाजोखा मांडणाऱ्या नागरिकांनी विद्यमान खासदारांपेक्षा नगरसेवकांची कामगिरी उत्तम. अशा शब्दांत प्रतिक्रिया नोंदविताना आता तुम्हीच आमचे खासदार असा ठाम विश्‍वास व्यक्त करीत आपल्याला भरघोस पाठिंबा मतदार देत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. विद्यमान खासदारांबाबत आपण यांना पाहिलंत का? अशा आशयाचे फलक कात्रजसह ठिकठिकाणी लावले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांनी आता परिवर्तनाचा निर्धार केला आहे. यंदा “शिरूर लोकसभा मतदारसंघात एकच फॅक्‍टर, अमोल कोल्हे डॉक्‍टर’हा नारा सामान्यांसह सुशिक्षित नागरिकांमधून दिला जात असल्याने परिवर्तन अटळ असल्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 15 वर्षे प्रतिनिधित्व करुनही नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तर ही खेदाची बाब तर आहे. शिवाय लोकप्रतिनिधित्वाच्या व्याख्येला हरताळ फासला जात आहे. केंद्रशासन स्तरावर रेल्वे उड्डाणपूल, सुसज्ज हॉस्पिटल, वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा, प्रदूषण कमी करण्यासाठी, आरोग्य विषयक उपक्रम, युवकांना करिअर मार्गदर्शन आदी विविध योजना राबविणे सहज शक्‍य आहे. मात्र त्यासाठी दूरदृष्टी असणे आवश्‍यक आहे. माझ्याकडे विकासाचा संपूर्ण सूक्ष्म आराखडा आहे आणि तो पूर्णत्वास नेण्याची क्षमताही आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी हडपसर परिसर पिंजून काढला. तत्पूर्वी सकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर आदिती गार्डन, मगरपट्‌टा येथे त्यांनी हास्ययोग, सूर्यनमस्कार, मॅरेथॉन क्‍लब अशा विविध क्‍लबच्या सदस्यांसह नागरिकांबरोबर संवाद साधला आणि आरोग्याला प्राधान्य किती आवश्‍यक आहे, त्यासाठी मतदारसंघात कोणत्या उपाययोजना आवश्‍यक आहे. याची माहिती दिली. प्रदूषण, आरोग्य आणि सुसज्ज हॉस्पिटल, केंद्र शासनाच्या माध्यमातून काय करणे आवश्‍यक आहे. यावर एकप्रकारे थेट -भेट कार्यक्रमच झाला आणि तो नागरिकांना भावला. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि काही नागरिकांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, विकास रासकर, योगेश ससाणे, सुनील बनकर, विठाबाई मगर, अलका मगर, नगरसेविका हेमलता मगर, मधुसूदन मगर, शार्दूल मगर आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी बंटर हायस्कुल, महात्मा फुले वसाहत, जयभवानी वसाहत येथे नागरिकांच्या समस्याही डॉ. अमोल कोल्हे यांनी जाणून घेतल्या.

चौकट- “एकच फॅक्‍टर, अमोल कोल्हे डॉक्‍टर’ प्रचार शिगेला
प्रचारादरम्यान डॉ. अमोल कोल्हे हे स्वतः प्रत्येक नागरिकांशी, कार्यकर्त्याशी संवाद साधत असल्याने जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. हडपसर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सूक्ष्म आराखडा कसा आहे. याची माहिती डॉ. अमोल कोल्हे मतदारांना देत असल्याने आता हडपसरमध्ये “एकच फॅक्‍टर, अमोल कोल्हे डॉक्‍टर’ हाच प्रचार शिगेला पोहचला आहे.

  • हा घ्या “विकलेल्या’ घराचा पत्ता
    डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःहून कधीच घर विकल्याचं भांडवल केलं नाही. त्यांच्या रेकॉर्ड झालेल्या फोन कॉलमधून सर्वांना ही गोष्ट समजली. त्यांनी स्वतःही कधी कुठल्याही व्यासपीठावरून ही गोष्ट सांगून भांडवल केली नाही किंवा करणार पण नाहीत. डा.ॅ अमोल कोल्हे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन्ही मिळून 4 कोटीच्या आसपास आहे. यातील स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित असून सरकारी नियमांनुसार त्याची चालू बाजारभाव किंमत देण्यात आली आहे. तरीदेखील घर विकल्याचा पुरावाच पाहिजे असेल तर, “के-10 आंबेकर नगर, परळ गांव, मुंबई 12′ हा विकलेल्या घराचा पत्ता आहे. तेथील आमदार, खासदार, नगरसेवक शिवसेनेचेच आहेत. हवे तर त्यांनी खात्री करून घ्यावी. असे उत्तार डॉ. काल्हे समर्थकांनी सोशल मीडियावरून दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.