पुणे.दि.18- पैशाच्या कारणावरुन झालेल्या भांडणात वडिल व मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोहिताप गॅरेज येथे घडली. याप्रकरणी शरद कैलास भोसले(40,रा.फुरसुंगी) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी बाळकृष्ण दत्तात्रय तारु (65,रा.पंचवटी बंगला, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरुन वाद झाले होते. यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत हाताने धक्का-बुक्की केली. यावेळी त्यांचा मुलगा योगेश(36) हा भांडणे सोडविण्यसाठीमध्ये आला. यामुळे आरोपीने त्यालाही शिवीगाळ करत त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला. तसेच फिर्यादीच्या खांद्यावरही लोखंडी रॉड मारला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. दोन वर्षापूर्वी त्यांने त्यांच्याकडून ट्रक विकत घेतला होता. मात्र त्याचे पैसे त्याला देता आले नाही. यामुळे त्यांनी त्याच्याकडून ट्रक परत मागीतला. मात्र त्याने ट्रकच्या दुरुस्तीसाठी खर्च केल्याने तो हा खर्च मागत होता. यावरुन वाद होऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपीलाही मारहाण झाल्याने परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.