मुंबई: आज पुण्यात अजून एक कोरोना बाधित रूग्ण आढळला आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. प्रशासन स्तरावर संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव प्रयोगशाळेत पाठवला जातो. राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले आहेत, असेराजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आज पुणे विभागातील कोरोना व्हायरस संदर्भातील सद्यपरिस्थितीचा राजेश टोपे यांनी आढावा घेतला. या बैठकीस पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी आरोग्य महासंचालक डॉ. साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक अर्चना पाटील, सार्वजनिक आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नांदापुरकर, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. राम अहंकारे उपस्थित होते.