पुणे – ‘शिवनेरी’च्या उत्पन्नातही एसटी पिछाडीवर

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित शिवनेरी बसेसच्या शनिवार आणि रविवार वगळता बाकी फेऱ्या रिकाम्याच धावत असल्याचे चित्र दिसत आहे. “शिवनेरी’च्या बाबतीतही महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.

पुणे-दादर, पुणे-दादर, पुणे-बोरिवली या मार्गावर एसटीच्या दैनंदिन 70 -80 बसेस ये-जा करतात. सोमवार ते शुक्रवारदरम्यान या बसेसची प्रवासी संख्या जवळपास 30-40 टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवनेरी बसेससाठी सुमारे 400 ते 600 रुपये तिकीट आकारले जाते. यासह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देखील देण्यात येत नाही. या कारणांमुळे बसेस रिकाम्या धावत असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.