मध्य प्रदेश – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद पाडल्याचा आपल्याला अभिमान आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोतर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुरवर ३ दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली असून ही बंदी उद्या सकाळी ६ वाजल्यापासून लागू केली जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे लावण्यात आलेल्या तीन दिवसांच्या प्रचारबंदीबाबत साध्वी प्रज्ञा सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना साध्वीने “काही हरकत नाही, मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करते.” असं म्हंटलं आहे.
BJP candidate from Bhopal, Pragya Singh Thakur on EC banning her from campaigning for 3 days: Koi baat nahi, main toh uska samman karti hoon. pic.twitter.com/TbUxxk2dmO
— ANI (@ANI) May 1, 2019