जयपूर – जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आज संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतामध्ये करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारत गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होता मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जात होता. परंतु आज संयुक्त राष्ट्र संघातर्फे मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने हा भारताचा मोठा कूटनीतिक विजय असल्याचं मानलं जात आहे.
याच पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना ‘जैश’च्या म्होरक्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात येणं हा आपला दहशतवादाविरोधातील मोठा विजय असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आता भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल असं देखील सांगितलं. ते म्हणाले, “आता देशाला जिथून कुठून धोका असेल तिथं घुसून आपण त्यांना मारू. त्यांनी जर गोळी मारली तर आपण त्यांना गोळा मारू.”
“आज संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या मागण्या मान्य केल्या जातात. भारताच्या मागण्यांना आता दुर्लक्षित करून जमत नाही. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की ही तर केवळ सुरुवात आहे अजून खूप काही होणं बाकी आहे.” असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
PM Narendra Modi at a public rally in Jaipur: Aaj Bharat ki baat puri duniya mein suni jaati hai. Bharat ki baat ko nazar-andaaz nahi kiya ja sakta hai. Aur main danke ki chot par kehna chahta hun ki ye to sirf shuruat hai, aage aage dekhiye hota kya hai. #MasoodAzhar pic.twitter.com/Qrx9zvtDgo
— ANI (@ANI) May 1, 2019
PM Narendra Modi at a public rally in Jaipur: UNSC has listed JeM's #MasoodAzhar as a Global Terrorist. In our fight against terrorism, it is a big victory. pic.twitter.com/f1mMrGjf0s
— ANI (@ANI) May 1, 2019