तीन हजारावर अधिकाऱ्यांनी बजावला पोस्टल मतदानाचा हक्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी आजअखेर तीन हजार 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 595 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची निवडणूक प्रशासनाने संधी उपलब्ध उपलब्घ करुन दिली आहे. यामध्ये चंदगड मतदार संघासाठी 238 अधिकारी-कर्मचारी, राधानगरी मतदार संघासाठी 519 अधिकारी-कर्मचारी, कागल मतदार संघासाठी 532 अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर दक्षिण मतदार संघासाठी 221 अधिकारी-कर्मचारी, करवीर मतदार संघासाठी 407 अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी 124 अधिकारी-कर्मचारी, शाहुवाडी मतदार संघासाठी 143 अधिकारी-कर्मचारी, हातकणंगले मतदार संघासाठी 281 अधिकारी-कर्मचारी, इचलकरंजी मतदार संघासाठी 131 अधिकारी-कर्मचारी आणि शिरोळ मतदार संघासाठी 345 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.