चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग येणार भारताच्या दौऱ्यावर

चेन्नई – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात ते पंतप्रधान मोदींसोबत तामिळनाडूतील महाबलीपुरम या शहराचा दौरा करणार आहेत. या दरम्यान, दुसऱ्या शिखर संमेलनात दोन्ही नेत्यांची भेट नियोजित करण्यात आली आहे.

तामिळनाडूतील ऐतिहासिक शहर महाबलीपुरममध्ये प्रधानमंत्री मोदी आणि शी जिनपिंग यांच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या द़ष्टिकोनातून किनारपट्टीवर पाण्यामध्ये पोहायला,बोटींग करायला आणि पाण्यातील विविध खेळांवर बंदी घालण्यात आली आहे.

दोन्ही उभयंत्यांमध्ये शिखर बैठकशी निगडीत कार्यक्रमांच आयोजन 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. कोवलमपासून ते महाबलीपुरमपर्यंतच्या 20 किलोमीटरच्या भागात कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.