अटी व शर्ती लागू; वैद्यकिय प्रमाणपत्र आवश्यक; स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा
पिंपरी – गावी जाण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांनुसार पोलिसांकडून परवानगी देण्यात येणार आहे. मात्र शहरात ज्या परिसरात कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत, त्या भागातील कोणत्याही नागरिकांना कुठेही जाता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वैद्यकिय प्रमाणपत्रही अनिवार्य करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केले. गृहमंत्रालयाने नुकतेच लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे परराज्यातील, महाराष्ट्रातील नागरिक ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आता आपल्या घरी जाण्याची ओढ आणखी तीव्र झाली आहे. यामुळे त्या सर्वांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचे पालन करूनच नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना स्थलांतराची परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्टपणे या आदेशात म्हटले आहे.
परराज्यात जाण्यासाठी अशी करा कार्यवाही
* पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थ्यांना ते राहत असलेल्या परिसरातील संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागेल.
* प्रत्येक व्यक्तीची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार.
* पोलीस ठाण्यातून ती माहिती तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल.
* जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित नागरिकांचे अर्ज त्यांच्या मूळ गावातील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.
* संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त नागरिकांना, नागरिकांच्या गटाला पास देतील.
* पाच पेक्षा कमी व्यक्तींना परराज्यात अथवा महाराष्ट्र राज्यात जिल्हाअंतर्गत तातडीच्या कारणास्तव प्रवास करायचा असेल तर त्यांनी covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर विनंती अर्ज करावेत.
* सोबत वैद्यकीय ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
ं* कंटेन्मेंट झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना परवानगी मिळणार नाही.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचे संपर्क
परिमंडळ एक
पिंपरी पोलीस ठाणे
020-27472218 / 27458180
pspimpri.pcpc-mh@gov.in
चिंचवड पोलीस ठाणे
020-27356767 / 27356768
pschinchwad.pcpc-mh@gov.in
निगडी पोलीस ठाणे
020-27655088
psnigdi.pcpc-mh@gov.in
भोसरी पोलीस ठाणे
020-27124728 / 27124375
psbhosari.pcpc-mh@gov.in
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे
020-27130003
psbhosarim.pcpc-mh@gov.in
आळंदी पोलीस ठाणे
021-35232214 / 9922832214
psalandi.pcpc-mh@gov.in
चाकण पोलीस ठाणे
021-35249333
pschakan.pcpc-mh@gov.in
दिघी पोलीस ठाणे
020-29700487
psdighi.pcpc-mh@gov.in
परिमंडळ दोन
वाकड पोलीस ठाणे
020-27261120 / 27261130
wakadps2014@gmail.com
हिंजवडी पोलीस ठाणे
020-22932119 / 22934622
pshinjewadi.pcpc-mh@gov.in
सांगवी पोलीस ठाणे
020-27286162
pssangvi.pcpc-mh@gov.in
देहूरोड पोलीस ठाणे
020-27671288
pidehuroad.pnr@mahapolice.gov.in
तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे
021-14222444
pstalegaond.pcpc-mh@gov.in
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे
9373606302
pitalegaonmidc.pnr@mahapolice.gov.in
चिखली पोलीस ठाणे
020-27492525
pschikhali.pcpc-mh@mahapolice.gov.in