कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील यांना पसंती

तरुणांसह अनुभवी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

निमसाखर-महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या वरीष्ठ पातळीवरील नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात यावी अशी चर्चा व इच्छा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची झालेली पडझड व काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल होण्याची शक्‍यता आहे. दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्या काळापासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या इंदापूर तालुक्‍याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले जावे व पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तरूणांची ओढ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन कॉंग्रेस पक्षत्तला ऊर्जितावस्थास प्राप्त करूनद्यावी अशी अपेखत्त कॉंग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशासह महाराष्ट्रात कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांसह माजी व आजी प्रदेशाध्यक्षांनाही पराभवाचा सामना करावा लागलो .त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यास कॉंग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये संभाव्य बदल अपेक्षित असून यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 1995 पासूनचा राज्याच्या मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव तसेच मंत्रीमंडळातील सहकार, संसदीय कामकाज मंत्री व महिला बालकल्याण मंत्री अशा विविध मंत्रीपदाचा सुमारे वीस वर्षांचा अनुभव पाठिशी असल्याने तसेच मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांसोबत कामाचा मोठा अनुभव पाटील यांच्या पाठिशी असुन हर्षवर्धन पाटील यांच्याकडे युवकांची ओढ राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसचा ढासळलेला गड संभाळण्याची जबाबदारी पक्ष हर्षवर्धन पाटलांवर टाकणार का? हे पाहणे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.