अणुऊर्जा विभागासाठी 16,925 कोटी रुपयांची तरतूद 

नवी दिल्ली –  केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्‍यक काही विशिष्ट कच्चा माल आणि भांडवली वस्तूच्या सीमाशुल्कात कपातीचा प्रस्ताव आहे. या उपाययोजनांमुळे देशांतर्गत निर्मितीला आणखी प्रोत्साहन मिळेल, असे केंद्रीय अर्थ निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

माहीबांसवाड़ा अणुऊर्जा प्रकल्प, कायगा अणुऊर्जा प्रकल्प, गोरखपुर अणुऊर्जा प्रकल्प आणि छुटका अणुऊर्जा प्रकल्पांसाठी सीमा शुल्क कपात केली जाणार आहे. अणुऊर्जा विभागासाठी 2019-20 च्या अर्थसंकल्पात 16,925 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.