नवी दिल्ली – शिक्षण क्षेत्रासाठीच्या निधीत केंद्रीय अर्थसंकल्पात 94 हजार 853 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वेळी ती तरतूद 83 हजार कोटी रूपये होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला 13 टक्के निधी वाढवून मिळाला आहे. शालेय शिक्षणासाठी 56 हजार कोटी तर उच्च शिक्षणासाठी 38 हजार कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) यावेळी 4 हजार 600 कोटी रूपये निधी मिळेल. तो मागील वेळेपेक्षा 87 कोटी रूपयांनी कमी आहे. जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांची उभारणी करण्यासाठी 400 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकार आता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्यासाठी सज्ज झाले आहे.