नकारात्मक घडामोडीमुळे विप्रोचा शेअर कोसळला अडीच टक्‍क्‍यांनी

विप्रो कंपनीकडून चौकशी; कर्मचाऱ्यांचे संगणक हॅक केले गेल्याची शक्‍यता

नवी दिल्ली – भारतातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असलेल्या विप्रो कंपनीसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या संगणकांचे हॅकिंग झाले असल्याची शक्‍यता असून याची चौकशी करण्यात येत असल्याचे विप्रो कंपनीने म्हटले आहे. याचा कंपनीच्या ग्राहकावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

या घडामोडीचा परिणाम मंगळवारी या कंपनीच्या शेअरच्या भावात झाला व कंपनीचे शेअर 2.5 टक्‍क्‍यांनी कोसळले. त्यातच मंगळवारी कंपनीने बराच चांगला ताळेबंद जाहीर केला आहे. या ताळेबंदानुसार कंपनीने चौथ्या तिमाहीत कमावलेला नफा 38 टक्‍क्‍यांनी वाढून 2494 कोटी रुपये झाला आहे. तर सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा 12.6 टक्‍क्‍यांनी वाढून 9017 रुपये झाला आहे. कंपनीने आज केलेल्या महत्त्वाच्या घोषणेनुसार कंपनी 10 हजार 500 कोटी रुपयांच्या शेअरची फेर खरेदी करणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here