आता बिग बॉस तमिळच्या महिला सदस्याला होणार अटक ?

छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो बिग बॉस कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादात येत असतो… हा शो मग तो कोणत्याही भाषेत असो हा शो सुरू झाला की यापाठोपाठ येतो तो यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा वाद…मराठी बिग बॉसमधील सदस्य अभिजित बिचुकले यांच्या अटकेची बातमी ताजी असतानाच आता तिकडे बिग बॉस तमिळच्या महिला सदस्याला अटक होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

स्टार विजय या वाहिनीवर सुरू असणाऱ्या बिग बॉस तमिळच्या तिसऱ्या पर्वात अभिनेत्री वनिता विजयकुमार या सहभागी झाल्या आहेत. मात्र त्यांच्यावर मुलीच्या अपहरणाचा आरोप करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटक होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. वनिता यांचे घटस्फोटित पती आनंद राजन यांनी स्वत:च्या मुलीच्या अपहरणाची पोलिसात तक्रार केली आहे. त्यामुळे याप्रकरणात वनिता यांना अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वनिता यांची कसून चौकशी केली असून त्यांच्या अटकेविषयी अद्याप कोणाताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वनिता आणि आनंद राजन यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता तसेच यावेळी त्यांच्या मुलीचा ताबा हा वडिलांकडे राहिल असे सांगण्यात आले होते. वनिता या दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते विजयकुमार आणि दिवंगत अभिनेत्री मंजुळा यांच्या कन्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)