#व्हिडीओ : भाजप आमदाराचा ‘तमंचे पर डिस्को’

नवी दिल्ली – उत्तराखंमधील भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांच्या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप आमदार हातात बंदूक घेऊन ‘मुझको राणा जी माफ करना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणावर लक्ष ठेऊन असल्याचेही पोलिसांनी म्हंटले असून शस्त्रांचे परवाने असल्याचेही तपासण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार प्रणव चॅम्पियन यांना अलीकडेच पत्रकारांना धमकावलय प्रकरणी पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.