मुंबई – 2019 हे वर्ष कतरिनासाठी खूपच खास आहे. एका बाजूला ती सलमान खानबरोबर “भारत’मध्ये असणार आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या बरोबर “सूर्यवंशी’मध्येही ती आहे. आता चक्क भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषाच्या बायोपिकमध्ये ती धावपटूच्या रोलमध्ये असणार आहे.
रेवती एस. वर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमामध्ये कतरिनाला या ऍथलिटचा रोल साकारणार असल्याची चर्चा सुरू असतांना धावपटू पी.टी.उषा यांच्या बायोपिकसाठी जॅकलिन फर्नांडिस नाव चर्चेत आहेत. पी.टी.उषा यांच्या भूमिकेसाठी जॅकलिनाच्या नावाचा विचार करत आहे. त्यामुळे आता या शर्यतीत कोण बाजी मारणार हे आपल्याला लवकरच कळेल.
रेवती एस. वर्मांनी यापूर्वी मल्याळम आणि तामिळमधील काही सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर अलिकडेच “आप के लिए है हम’चे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. जरी कतरिनाला पी.टी. उषाचा रोल ऑफर करण्यात आला असला, तरी कतरिनाने अद्याप तिचे उत्तर दिलेले नाही. मात्र ही संधी ती मुळीच वाया जाऊ देणार नाही. हा रोल ती स्वीकारण्याचीच जास्त शक्यता आहे. कतरिनाच्या आगोदर या रोलसाठी जॅकलिन फर्नांडिसचे नाव पुढे आले होते. मात्र जॅकलिन फर्नांडिसने कोणतीही ठाम प्रतिक्रिया दिली नाही. पिलावुल्लकंडी थेक्केपराम्बील उषा अर्थात पी.टी उषाला “भारताची सुवर्ण कन्या’, “क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक ऍन्ड फिल्ड’ आणि “पय्योली एक्सप्रेस’ या नावांनीही ओळखले जाते.