राहुल गांधींच्या राजीनाम्या विषयी रजनीकांत काय बोलतात

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. निवडणुकीतील प्रभावाची जबादारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला होता. परंतु, या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळला असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. मात्र, अजून तरी राजीनाम्यावर ठाम असलेल्या राहुल यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्याकडून सुरु आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनामा विषयी बोलताना तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते ‘रजनीकांत’ यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ‘राहुल गांधी यांनी राजीना देऊ नये, आपण दाखवून देऊ शकतो हे राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवावे’ असं रजनीकांत म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून विजय मिळवला असला तरीही परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. तर १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)