ट्रम्प यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ

विरोधकांनी केला सभात्याग

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्‍मीर प्रश्‍नावरून मोदींच्या संबंधात जो दावा केला आहे त्याविषयावरून आज लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी खुद्द मोदींनी सभागृहात खुलासा करावा अशी मागणी विरोधकांनी लाऊन धरली. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात या प्रकरणी घोषणाबाजी सुरू करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

कॉंग्रेस नेते मनिष तिवारी म्हणाले की ट्रम्प यांचे विधान गंभीर आहे. मोदींनीच आपल्याला काश्‍मीर प्रश्‍नात मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे ते म्हणाले आहेत ही गंभीर बाब आहे, त्यावर खुद्द मोदींनीच खुलासा केला पाहिजे. तृणमुल कॉंग्रेसचे सौगत रॉय म्हणाले की या प्रकरणात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खुलासा केला असला तरी तो आम्हाला अमान्य आहे. अद्रमुकचे टी. आर. बालू म्हणाले की या प्रकरणात मोदींचे नाव घेतले गेले असल्याने त्यांनी व्यक्तीगत पातळीवरच हा खुलासा केला पाहिजे.

त्यावर विदेश मंत्री जयशंकर हे खुलासा करण्यास उठले असता त्यांना सर्वच विरोधी सदस्यांनी विरोध केला. त्या गदारोळात जयशंकर यांचे निवेदन कोणालाच ऐकू आले नाही. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सभापतींना जयशंकर यांना पुन्हा निवेदन करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. त्यांनी केलेले निवेदन लोकांना नीट समजण्याची गरज आहे असे ते म्हणाले. मोदींनी ट्रम्प यांना अशा प्रकारची विनंती केली नव्हती असा खुलासा जयशंकर यांनी केला. द्विपक्षीय संबंध आपसातील चर्चेनेच सुटले पाहिजेत अशीच भारताची भूमिका आहे असेही त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)