जुनागड – गुजरातमधील जुनागड महापालिकेत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या महापालिकेतील 60 पैकी 51 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत तर कॉंग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाला चार जागा मिळाल्याने हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
यावेळी 60 पैकी 56 जागांवर प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कॉंग्रेसच्या तुलनेत लक्षणीय यश मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या महापालिकेत कॉंग्रेसचे संख्या बळ 15 इतके होते. ऐन निवडणूक काळात शहर कॉंग्रेस अध्यक्ष विनु अमिपारा यांनी कॉंग्रेस सोडून भाजप मध्येप्रवेश केल्याने कॉंग्रेस मध्ये स्थानिक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती.