सुपरस्टार झाल्याचा तापसीला विश्‍वास नाही 

आपण सुपरस्टार झालो आहोत, यावर तापसी पन्नूला अजूनही विश्‍वास वाटत नाही. तिचे सिनेमे मात्र हिट झाले आहेत, हे मात्र नक्की. या यशस्वी सिनेमांच्या आधारेच मिळालेले यश एखाद्या विजयापेक्षा कमी नाही. असे ती मानते. एका पोर्टलवरच्या प्रश्‍नोत्तरांच्या सदरामध्ये तापसीने आपली भावना मांडली आहे. आपल्या यशाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणी वेळ काढला आहे, हीच मोठी बाब आहे, असल्याचे ती म्हणाली. कंगणा रणावतची बहिण रंगोलीने मध्यंतरी तिला विनाकारण छेडले होते. तापसी कंगणची कॉपी करते. ती अगदी “सस्ती कॉपी’ आहे, असे रंगोली म्हणाली होती. कंगणानेही आपल्या बहिणीचे समर्थन केले होते.

जे लोक दुसऱ्यांची चेष्ठा करतात, त्यांनी स्वतःच्य चेष्ठेसाठीही तयार रहायला पाहिजे, असे कंगणा म्हणाली होती. त्यावरही तापसीने उत्तर दिले आहे. जर एखाद्या व्यक्‍तीवर टीका केली जात असेल तर टीका करणाऱ्या व्यक्‍तीसाठी आपण महत्वाचे आहोत, असे समजावे. आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायला अधिक आवडेल. विनाकारण वादामध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा ते अधिक महत्वाचे आहे, असे ती म्हणाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)