सल्लागारांचे सल्ले पडताहेत महागात!

नागरिकांच्या पैशांची लूट होत असल्याचा नगरसेवक काटे यांचा आरोप

चुकीचा सल्ला, पाण्याचा अपव्यय

स्ट्रॉम वॉटर लाईनद्वारे वाया जाणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या मुद्‌द्‌यावरही काटे यांनी आक्षेप घेतला असून. पावसाचे पाणी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम करून जमिनीत मुरवणे आवश्‍यक असताना ते पाणी स्ट्रॉम वॉटर लाईनच्या माध्यमातून नद्या नाल्यांमध्ये सोडणे म्हणजे पाण्याचा अपव्यय असून सल्लागार असलेल्या “केपीएमजी’ यांनी चुकीचा सल्ला दिला असल्याचा आक्षेप घेतला आहे.

पिंपरी  –पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक कौशल्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना महापालिकेचे सल्लागार प्रकल्पाचा खर्च फुगवून पिंपरी-चिंचवडकरांनी कररुपी भरलेल्या पैशांची लूट करीत असल्याचा घणाघात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केला आहे.

यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
60 कोटींचा अनावश्‍यक खर्च पिंपळे सौदागर परिसरात आवश्‍यकता नसतानाही रस्त्याच्या मधोमध मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकून केवळ निवेदेतील रक्कम वाढवून त्या माध्यमातून तब्बल 60 कोटी रुपयांचा अनावश्‍यक खर्च पालिकेच्या माथी मारण्याचे काम सल्लागार करत आहेत. त्यामुळे स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामात निविदेची रक्कम कमी करून रचनेत बदल करण्याचे आदेश शहर अभियंता, प्रकल्प अभियंता आणि सल्लागार यांना देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

अहवाल देण्यात यावेत “केपीएमजी’ या सल्लागाराने जेएमएनएनआरयुएम मधील स्ट्रॉम वॉटर लाईनची तपासणी केली आहे का याचा अहवाल द्यावा, स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामाचा तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र सरकारकडून मंजूर विकासकामांचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट सादर करावा, स्मार्ट सिटीच्या मे.शिर्के इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला मिळालेल्या कामाचा सल्लागाराने तयार केलेल्या डीपीआरची प्रत देण्यात यावी, या मागण्या काटे यांनी केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)