मुंबई- प्रभु देवा यांच्या ‘कलाधन’ या तामिळ चित्रपटातील ‘मुक्काला- मुकाबला’ हे लोकप्रिय गाणं पुन्हा एकदा नव्या स्टाईल मध्ये येणार आहे. नव्वदच्या दशकात हे गाणं तुफान गाजलं होत. दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्या ‘स्ट्रीट डान्सर- ३’ या चित्रपटात हे गाणं नव्यानं चित्रित करण्यात येणार असून, पुन्हा एकदा प्रभू देवाच या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
‘स्ट्रीट डान्सर- ३’ या चित्रपटात पुन्हा एकदा अभिनेता वरून धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात वरून धवन एका पंजाबी युवकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे श्रद्धा कपूर पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून, ८ नोव्हेंबर २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.‘एबीसीडी’, ‘एबीसीडी- २’नंतर आता तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट असणार आहे.