21.1 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: raj thackeray

‘राज ठाकरे-शरद पवार’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

मुबंई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. या भेटीत नेमकी...

‘मोदी-शाह’ विरूध्द देश अशी 2019 लोकसभेची निवडणूक – राज ठाकरे

मुंबई - भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न...

मनसे महाआघाडीत नाहीच; लवकरच राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला राष्ट्रवादीकडून कल्याण, ईशान्य मुंबईतून जागा मिळे ल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित केल्याने महाआघाडीत मनसे सामील होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून आज कल्याण, ईशान्य...

राज ठाकरे ज्योतिषी, माझी पत्रिका त्यांना दाखवणार, कारण त्यांना माहिती होतं..- जितेंद्र आव्हाड

मुंबई - एरव्ही ज्योतिषाकडे न जाणारा मी आज मात्र निर्णय घेतलाय कि ज्योतिषाकडे जाऊन माझी पत्रिका दाखवणार. आणि ते ज्योतिष दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द राज ठाकरे आहेत, अस ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी वर्षभरापूर्वी वर्तवल...

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एका वृत्तवाहिनीला दीर्घ मुलाखत देऊन आपले मौन सोडले. तब्बल ९० मिनिटांच्या या मुलाखतीत मोदी यांनी राममंदिर, पाकिस्तान, कॉंग्रेसमुक्‍त भारत, नोटाबंदी, जीएसटी, काळा पैसा यासह सर्व विषयांना स्पर्श केला. या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर व्यंगचित्रातून...

मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का : राज ठाकरे

मराठी संस्थाचालकांना संस्था सुरु करण्याचे आवाहन  पुणे - "मराठी संस्थाचालक मुंबईत येऊन संस्था का उभारत नाहीत? मुंबईमध्ये केवळ गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांनीच संस्था बांधयच्या का? मराठी लोकांनी मुंबई ही परप्रांतीयांना आंदण दिली आहे का? असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र...

राम मंदिरावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून राजकीय फटकारे  

मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबाबत रोज नवीन दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत राम मंदिराची लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यही राम मंदिर उभारणीसाठी जोरदार मागणी करत आहेत....

दुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘दंडुका मोर्चा’

मुंबई - राज्यात कमी पाऊस पडल्याने अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारकडून उपाययोजना आणि अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीने "दंडुका मोर्चा' काढण्यात येणार आहे. पहिला मोर्चा 27 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे काढणार आहे. याबाबत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली....

आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी : संजय निरुपम 

मुंबई  - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एका उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी. त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. आमच्याकडून चुकी...

शेतकऱ्यांनो सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका – राज ठाकरे 

मुंबई - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राची मालिका सुरु केली असून पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. या व्यंगचित्रातून भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. काय...

अमित शहा म्हणजे नरकासुर : राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा 

मुंबई - दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राची मालिका आणली आहे. आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी भाजपला व्यंगचित्रातून लक्ष्य केले. अभ्यंग स्नान आणि नरक चतुर्दशी आशा मथळ्याखाली दोन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा...

कोकणची भूमी हे केरळसारखीच देवभूमी – राज ठाकरे

मुंबई - अनेक आमदार, खासदार कोकणातून आले. मात्र आताची स्थिती पाहता कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही. ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच देवभूमी आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपलं...

#शतदाविंदा: राज ठाकरेंनी जाग्या केल्या विंदांसोबतच्या आठवणी…

मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांची आज शंभरावी जयंती. विंदा यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ ला झाला होता. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. करंदीकर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना...

गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे 

नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असें म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी...

गणेशोत्सवातच ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का…

राज ठाकरे : बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा मुंबई - प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का केली जाते, असा सवाल करत गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त गणेशोत्सव साजरा करावा. मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो,...

राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध – नारायण राणे

मुंबई - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी केला आहे. केवळ मराठा आरक्षणाच्यावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का? असा...

निवडणूक येताच भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा पुढे – राज ठाकरे

औरंगाबाद - भाजपकडे चार वर्षांपूर्वी बहुमत होते. पण आताच राम मंदिर का आठवले.कारण निवडणूक जिंकणे कठीण असल्याचे लक्षात येताच भाजप राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहे. तसेच राम मंदिरच्या नावाने दंगल घडवून हिंदू मत एकवटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मनसेचे...

राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे : रामदास कदम

मुंबई : राज्यातील प्लास्टिकबंदीवरुन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाकयुद्ध सुरुच आहे. राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे. व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन त्यांनी शिवसेनेची बदनामी सुरु केल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा विभागात शिवसेनेतर्फे कापडी पिशव्या वाटप...

राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मुंबईतील रहेजा कॉलेजमधील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. विष प्राशन करून या...

…दंड न भरण्याचे जनतेला आवाहन

निवडणूक फंड गोळा करण्यासाठीच प्लॅस्टिकबंदी राज ठाकरेंची रामदास कदमांवर बोचरी टीका मुंबई - शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी प्लॅस्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे, अशी बोचरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास...

ठळक बातमी

Top News

Recent News