12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: kolhapur news

video: आघाडीच्याही प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार ; मुश्रीफ, महाडिक यांची माहिती

 युतीपेक्षा आघाडीची सभा विराट असेल कोल्हापूर: युतीच्या आणि आघाडीच्या सुद्धा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार आहे. सेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात २४ मार्चला फोडणार आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस- राष्ट्रवादी सुद्धा प्रचाराची सुरवात कोल्हापुरातून करणार असून युतीच्या सभेपेक्षा ही सभा विराट असेल असे खासदार धनंजय महाडिक आणि...

कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गूळ सौदे बंद… जोरदार वादावादी

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 3 दिवासांपासून गुळाचे सौदे बंद आहेत. हमालांनी अतिरिक्त वेळ काम करण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून गूळ सौदे बंद ठेवले आहेत. त्यामुळं कोट्यवधी रुपयांचा गूळ बाजार समितीत पडून राहिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हमाल, व्यापारी आणि...

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन 

कोल्हापूर - खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले. याप्रसंगी दख्खन केदाराची संपूर्ण माहिती देणारी shreejotibatemple ही वेबसाईट आणि याच नावाने एक मोबाईल ऍपचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सायंकाळी 5:30 च्या सुमारास ते जोतिबा मंदिर परिसरात पोहोचले. यावेळी...

परभणीच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 

कोल्हापूर - 15 - 2017 सालातील खरिपातील सोयाबीन पिक विमा ची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी परभणीच्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढला. पीक विम्याची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला...

कोल्हापूरातील सराफी दुकानात धाडसी चोरी

कोल्हापूर: कोल्हापूरातील दोन सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आले असून अंदाजे 22 लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झाली असली तरी ती एकाच टोळीने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी...

भारत राखीव बटालियनच्या समादेशकास लाचप्रकरणी अटक 

कोल्हापूर - गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी व सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने भारत राखीव बटालियन 3'च्या समादेशकास निवृत्तीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

जलसिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा 

शेतकऱ्यांच्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना होणार फायदा कोल्हापुर - राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रति युनिट 1 रुपया 16 पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसातच आज राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने तातडीने शासन...

आता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही – अजित पवार 

कोल्हापूर:  ‘खुद्द नितीन गडकरी म्हणालेत की, आश्वासनांची पूर्तता केली नाही तर जनता धुलाई केल्याशिवाय राहत नाही. मग आता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय नक्कीच राहाणार नाही,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी या सभेत व्यक्त केले. भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन...

मोदी फक्त हवेत घोषणा करतात- जयंत पाटील

कोल्हापूर: भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेची सभा आज झाली. सभेला स्थानिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात इतक्या घोषणा केल्या जातील की, आपल्याला वाटेल आतापर्यंत मोदींनीच आपल्याला...

भाजपा – शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : धनंजय मुंडे 

कोल्हापूर: भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेची सभा आज झाली. सभेया वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तीन-चार तासांपासून चर्चा सुरू आहे की, धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही...

‘नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ; जिल्हा बँकांमध्ये अजूनही पैसे पडून’

कोल्हापूर: राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाली. परिवर्तन यात्रेची पहिली सभा कोल्हापूरमधील कागल येथे झाली या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. लाखोंचा पोशिंदा सुखी नाही, आया-बहिणी सुरक्षित नाहीत, कुपोषणाने डोके वर काढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्याला...

करंट्या सरकारमुळे ‘लाखांचा पोशिंदा’ असलेला शेतकरी सुखी नाही- अजित पवार

कोल्हापूर: करंट्या सरकारमुळे 'लाखांचा पोशिंदा' असलेला शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. अन्नपाण्याअभावी कुपोषणाने डोकं वर काढलं आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार आहात की नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला ते कागल येथील...

सरदार पटेल पुतळ्यापेक्षाही शिवस्मारक उंचच – विनायक मेटे

कोल्हापूर: अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची गुजरातमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षाही जास्त असणार आहे. या कामात खोडा घालण्यासाठीच जाणिवपूर्वक उंचीचा वाद वाढवला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात दिलेली स्थगितीही लेखी नसून तोंडी आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ सरकारी वकीलांच्या नेतृत्वाखाली वकीलांची फौज तैनात...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षणगृहात गैरप्रकार ; राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचा छापा

कोल्हापूर: कोल्हापुतील सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहामध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये गैरसोय आढळून आल्याने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी निरीक्षण अधिक्षकांची चांगलीच खरडपट्टी केली. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी आज दुपारी अचानक या निरीक्षणगृहावर छापा टाकला. सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि निरीक्षणगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात...

रागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून

कोल्हापूर: वारंवार होणाऱ्या भांडणाच्या रागातून पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील साकोली कॉर्नर येथे घडली. सागर नारायण बोडके (वय 32) असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, साकोली कॉर्नर इथे राहत असलेल्या सागर बोडके आणि पत्नी निर्मला यांच्यात कौंटुबिक कारणातुन...

विरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी साधला संवाद कोल्हापूर: विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव आत्ताच दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. हे लोक आतापासूनच ईव्हीएमवर दोषारोप करून ईव्हीएमला खलनायक ठरवत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक जिंकायची इच्छा आहे....

कोल्हापुरात हरणाच्या शिंगासह चंदनचोर टोळी जेरबंद

कोल्हापूर: महागाव ते वैरागवाडी रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गडहिंग्लज पोलिसांनी तीन चंदन चोरांना पकडले. त्यांच्याकडून हरणाची दोन शिंगेही जप्त करण्यात आली आहेत.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुनील मारुती शिंदे (वय 25), राजू संजय मोरे (21, दोघे रा. गडहिंग्लज) व राजेंद्र परशराम चंदनवाले (47,...

रस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून यंदा राज्य शासनाने 30 हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे. यातून राज्यात रस्ते विकासाचं जाळं निर्माण करण्यात येणार आहे, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. हातकणंगले तालुक्‍यातील आळते येथे...

सलग तिसऱ्या वर्षी धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान

सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान, तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते चेन्नईत झाला गौरव कोल्हापूर - संसदेच्या दोन्ही सभागृहात देश-समाजहिताचं काम चालावं ही जनतेची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात हा अनुभव आहे. त्यामुळंच खासदारांनी...

विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी

कोल्हापूर: पीक कर्जाच्या बदल्यात खासगी इन्शुरन्स काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीवरून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. कर्जाच्या बदल्यात बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाणे हे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतल्यासारखे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन करणार नाही....

ठळक बातमी

Top News

Recent News