सुष्मिता सेन बॉयफ्रेन्डसह अमृतसरच्या सुवर्णमंदिरात

सुष्मिता सेन तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डमुळे अचानक चर्चेत आली आहे. रोहमन शॉल या तिच्या बॉयफ्रेन्डबरोबरचा तिचा एक व्हिडीओ सुष्मिताने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. त्या व्हिडीओला खूप फॅन्सकडून बघितले जाते आहे. सुष्मिता सेन आणि तिचा हा बॉयफ्रेन्ड अमृतसरमधील सुवर्णमंदिरात गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. तेथे या दोघांनी एकत्र दर्शन घेतले आणि गुरुग्रंथसाहिबपुढे डोके टेकले. सुष्मिताला तिच्या फॅन्सनी इथेही सोडले नाही. तिच्याभोवती तिच्या फॅन्सचा गराडा पडला.

त्यांच्याबरोबर सुष्मिता हसत खिदळताना दिसते आहे. तसेच तिने या फॅन्सबरोबर सेल्फीही काढले. “वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह’ अशी कॅप्शनही सुष्मिताने या व्हिडीओला दिली आहे. सुष्मिता आणि रोहमन शॉल गेल्या महिन्यापासून एकत्र रहायला लागले आहेत. त्यांच्यातील अफेअरची चर्चा आता अधिकृत व्हायला लागली आहे. आगामी काही महिन्यातच सुष्मिता आणि रोहमन विवाहबद्ध होणार असल्याचेही ऐकायला मिळते आहे. कदाचित याच विवाहाच्या घोषणेपूर्वी या दोघांनी एकत्र गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घ्यायचे ठरवलेले असावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)