मध्य प्रदेशात- 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्या पासून जोरदार सुरवात झाली आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. आता पर्यंत अनके दिग्ज नेत्यांनी मतदान केले आहे.
Madhya Pradesh: Lok Sabha Speaker & BJP leader Sumitra Mahajan casts her vote at a polling booth in Indore. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/mPUmPXFHS2
— ANI (@ANI) May 19, 2019
लोकसभा सभापती आणि भाजपचे नेते ‘सुमित्रा महाजन’ यांनी देखील इंदौरमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी हजेरी लावली. मध्य प्रदेशात ऐकून 8 जागांसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. अखेरच्या टप्प्यासाठी बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे.