सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानातून घेतले उड्डाण

म्यानमार हवाई दल प्रमुखांची लोहगाव एअरफोर्स स्टेशनला भेट
पुणे – म्यानमारचे हवाई दल प्रमुख जनरल मॉंग मॉंग क्‍याऊ यांनी लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण करत विमानाची लढाऊ क्षमता, त्याचे व्यवस्थापन आणि भारतीय बनावटीच्या “आकाश’ मिसाईलबाबत याबाबत माहिती घेतली.

भारत दौऱ्यावर असलेले जनरल क्‍याऊ हे गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनला भेट दिली. हवाई दलाच्या दक्षिण-पश्‍चिम (नैऋत्य) मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल हरजित सिंग अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल चर्चा केली. तसेच एअरमार्शल अरोरा यांनी जनरल क्‍याऊ यांना मुख्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रदेशातील संरक्षण संदर्भातील विकास कामांबाबत माहिती दिली. तसेच पुण्यात सुखोई विमानांचे उड्डाण आणि व्यवस्थापन प्रशिक्षण सुविधेबाबतही मार्गदर्शन केले. जनरल क्‍याऊ यांच्या स्वागतासाठी लोहगाव हवाईदल केंद्र येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)