विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा मुहुर्त साधत रणवीर सिंह आपल्या आगामी “83′ चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला पोहोचला आहे. रणवीर आणि त्याच्या को-स्टार्सने चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमधील शूटिंगला बुधवारपासून श्रीगणेशा केलेला आहे. याबाबत चित्रपटाचे निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-2019 सुरू आहे. या स्पर्धेचे निमित्त साधत रणवीर सिंहने क्रिकेटमधील दिग्गज खेळांडूची भेट घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत काढलेले सेल्फी सोशल मीडियावरही शेअर केले होते.
कबीर खान निर्मित “83′ हा चित्रपट 1983 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित असून ही विश्वचषक स्पर्धा अनपेक्षीतरित्या भारताने जिंकली होती. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. यात तो माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात रणवीर सिंहशिवाय साकिब सलीम, आर. बद्री, हार्डी संधू, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, अम्मी विर्क आणि साहिल खट्टर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.