भगवा हा गौरवशाली रंग – शशी थरुर

नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेतील भारतीय क्रीकेट संघाची भगव्या रंगाची जर्सी बनवण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू ही नवीन जर्सी घालून मैदानात उतरले होते. ही नवीन जर्सी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. परंतु या भगव्या रंगावरुन देशभरात मोठे राजकारण सुरु झाले. जर्सीच्या भगव्या रंगाला विरोध करणाऱ्या आणि त्यावरुन राजकारण करणाऱ्या लोकांना कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

थरुर नव्या जर्सीबाबत म्हणाले की, भगवा हा गौरवशाली भारतीय रंग आहे. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार दोन संघांच्या जर्सीचा रंग सारखा असेल, तर यजमान संघाला त्यांच्या जर्सीचा रंग बदलण्याची आवश्‍यकता नाही. परंतु पाहुण्यांना त्यांची जर्सी बदलून खेळावे लागेल. इंग्लंड आणि भारतीय संघाची जर्सी एकाच रंगाची असल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला वेगळ्या रंगाची जर्सी परिधान करणे बंधनकारक होते. हा वेगळा रंग म्हणून भारताने भगव्या रंगाची निवड केली आहे. हा गौरवशाली भारतीय रंग आहे.

थरुर एवढ्यावरच थांबले नाहीत. थरुर स्वतः हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. ते म्हणाले की, मीदेखील या सामन्यात भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भगव्या रंगाचे जॅकेट घालून मैदानात उपस्थित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)